Wednesday, April 13, 2011

शांतता प्रेमी पुणेकरांचा एकता मेळावा - जाहीर निमंत्रण


शांतता प्रेमी पुणेकरांचा एकता मेळावा
जाहीर निमंत्रण

आपल्या पुणे शहरामध्ये विविध धर्माचे लोक नांदत आहेत. या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. पुण्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा आपण धैर्याने मुकाबला केला आहे. सुमारे पन्नास वर्षापूर्वी पानशेतच्या पुरामुळे पुण्यावर संकट ओढवले. यावेळीही पुणेकर निर्धाराने उभे राहिले.

लकडी पुलाजवळ (संभाजी पूल) मंदिर व मस्जीत शेजारी शेजारी होती. पुरामध्ये सर्व वाहून गेले. इतर इमारती व मंदिर काही काळाने उभे राहिले. पण मशिदीच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया राजकारणात अडकली. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी यामध्ये अडथळे आणले. न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला मशिदीच्या पुनर्बांधणीला परवानगी देण्याचे आदेश देऊनही परिस्थिती बदलली नाही.

मशिदीमुळे या भागात तणाव असल्याची कधीही नोंद नव्हती व पुढेही असणार नाही. अनेक हिंदू धर्मीय नागरिकांनी मशिदीच्या पुनर्बांधणीसाठी सहकार्य केले व त्यांचे या प्रक्रियेला समर्थन आहे. प्रार्थनास्थळ हा प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धेचा व अधिकाराचा विषय असतो. या मशिदी संदर्भात न्यायालयाने आदेश दिल्याने या अधिकारावर शिक्कामोर्तब झाले आहे. म्हणूनच या आदेशाचे पालन करणे हि मनपा प्रशासनाची व शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. या प्रक्रियेला समर्थन देणे हे आपल्या सर्वांचे एक संवेदनशील नागरिक म्हणून कर्तव्य आहे. यामध्ये सहभागी होऊन आपण या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन शांती दल करीत आहे.

रविवार, दिनांक १७ एप्रिल २०११
सायंकाळी, .३० वाजता
स्थळ: गांधीभवन, कोथरूड, पुणे.

वक्ते:
मा. भाई वैद्य, मा. उल्हासदादा पवार, मा. रमेश बागवे,
मा. वंदना चव्हान, मा. शांतीलाल सुरतवाला, मा. रशीद शेख इतर मान्यवर

अध्यक्ष:
डॉ. कुमार सप्तर्षी

निमंत्रक
अन्वर राजन संदीप बर्वे
कार्याध्यक्ष, शांती दल कार्यवाह, शांती दल
मोब. ९४२१० ५१६१७ मोब. ९८६०३८७८२७

No comments:

Post a Comment