Sunday, April 10, 2011

युक्रांदच्या सत्याग्रहाचा विजय - शिक्षण सेवकांच्या मागण्या मान्य

गेल्या १४ दिवसांपासून सेन्ट्रल बिल्डींग पुणे येथे शिक्षण सेवकांच्या न्याय मागण्यांसाठी सुरु असलेला सत्याग्रह यशस्वी झाला. शासनाने उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे आणि त्यांच्या गुंडांनी गुणवत्तेनुसार निवड झालेल्या शिक्षण सेवकांना सेवेत रुजू होऊ दिले नव्हते. बाहेरील जिल्ह्यातील शिक्षण सेवक नकोत अशी राज्यघटना विरोधी भूमिका घेतली होती. या जिल्हावादाच्या विरोधात १६४५ शिक्षण सेवकांसह युवक क्रांती दलाने बेमुदत व निर्णायक सत्याग्रह सुरु केला होता. सत्याग्रहाच्या १५ व्या दिवशी राज्य शासनाने सर्व शिक्षण सेवकांना सेवेत रुजू करून घेण्याचे मान्य केले.

संयम ठेवला तर अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने निश्चित यश मिळते यावरचा विश्वास अजूनही दृढ होत आहे. या सत्याग्रहात पाठींबा दिलेल्या सर्व नागरिकांचे, संघटनांचे आणि प्रसारमाध्यमांचे मनपूर्वक आभार!

No comments:

Post a Comment